समकालीन युगामध्ये व्यक्तिमत्व विकासातील सर्वात महत्वाचा घटक ‘बुद्धी’ मानला जात आहे. सध्याचे शालेय शिक्षण बहुतकरुन विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास व्हावा यासाठी प्रयत्नरत असते.
बौद्धिक विकासात दोन महत्वाच्या गोष्टींचा अंतर्भाव केला जातो: 1. विवेकपूर्ण विचार, 2. सृजनशीलता.
बौद्धिक विकासासाठी गुरुकुलातील रचना:
- महाराष्ट्र शासनाचा इयत्ता 5वी ते 10वी शालेय अभ्यासक्रम
- स्पर्धा परिक्षेत सहभाग (सामान्य ज्ञान, NTS, MTS, Scholarship, नवोदय, चित्रकला )
- इ-लर्निंग • प्रकल्प पद्धतींनी अभ्यास (Project Based Learning)
- अध्यापन व अध्ययनात नैसर्गिक साधनांचा पुरेपुर वापर
- अध्यापन व अध्ययनात सृजनशील उपक्रम
- संगणक प्रशिक्षण
- 5000 पुस्तकांचे ग्रंथालय
- अभ्यासक्रमातील व अभ्यसक्रमोत्तर विज्ञान प्रयोग
- शैक्षणिक सहलींचे आयोजन
- कल्पक साप्ताहिक फलक लेखन
- बौद्धिक विकासाच्या मासिक उपक्रमाची रचना
- स्पोकन इंग्लिशवर विशेष भर
- विविध स्पर्धा व परीक्षांची तयारी
- तज्ञांचे मार्गदर्शन
- दूरदर्शनवरील बातम्या व इतर काही कार्यक्रम