संतुलित, स्वयं-अनुशासित मन जगातील कुठलेही कार्य सहज पार पाडू शकते. तसेच विविध सामाजिक समस्यांचे मूळ हे अस्वस्थ मन आहे. म्हणून व्यक्ती विकासासाठी मनाचे प्रशिक्षण हा सर्वात महत्वाचा बिंदू मानलेला आहे. चेतन व अर्धचेतन मनाच्या विकासासाठी विविध पद्धती वैज्ञानिक संशोधनातून पुढे आलेल्या आहेत. त्यांच्या योग्य कार्यवाहीतून मानसिक विकास होत असतो.

मानसिक विकासासाठी गुरुकुलातील रचना:

 • अखंड सहजीवन
 • गटपद्धतीने कौटुंबिक वातावरण
 • उद्योगशील उपक्रमांद्वारे मनाला सृजनशीलतेचे प्रशिक्षण. (खडू बनवणे, स्क्रीन प्रिंटिंग, वेल्डिंग, ग्रीटिंग कार्ड बनवणे इ उद्योगशील उपक्रम)
 • नियमित ध्यान (एकाग्रता, मानसिक स्थैर्य)
 • नियमित सण- उत्सवांचे साजरीकरण
 • साप्ताहिक पालक फोन संपर्क
 • मासिक पालक भेट
 • व्यक्तिगत संवाद व मार्गदर्शन
 • दैनिक सहभोजन
 • जीवनोपयोगी चांगल्या सवयी
 • गुणविकास उपक्रम
 • साप्ताहीक चिंतन
 • नियमित कार्यकर्ते व विद्यर्थ्यांच्या बैठका