शारीरिक विकासामध्ये महत्वाच्या दोन गोष्टी आहेत. 1. उत्तम आरोग्य बनवणे व ते टिकवून ठेवणे. 2. आजारांवर/व्याधींवर उपचार करणे.
शारीरिक विकासासाठीची रचना व उपक्रम:
विविध उपक्रमांतून या दोन्ही पातळीवरती विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास होत आहे.
- नियमित व्यायाम: धृतयोग , सूर्य नमस्कार , योगा, ट्रेकिंग, धावणे.
- प्राणायाम: नाडीशुद्धी, भस्रिका, अनुलोम विलोम, कपालभाती.
- खेळ: रोज दीड तास मैदानी खेळ.
- श्रमनिष्ठा : स्वत:ची कामे स्वत: करणे, परिसर स्वच्छता, वाढप व्यवस्था, बागकाम, सप्ताहातून एक तास विशेष श्रमयोग.
- आहार: शुद्ध शाकाहारी पूर्ण पोषक आहार.
- गुरुकुलात सेंद्रीय शेतीतून उत्पादन झालेल्या दूध, फळ, भाज्यांचा दैनिक आहारात सामावेश.
- तज्ञांकडून वार्षिक आरोग्य तपासणी .
- उपचार: तज्ञांचे नियमित मार्गदर्शन, साप्ताहिक डॉक्टर भेट,प्राथमिक उपचारासाठी आरोग्य पेटी.
- प्रतिबंधात्मक आयुर्वेदिक काढा.