सामाजिक विकासामध्ये मूलत: दोन भाग आहेत. 1) व्यक्ती पातळीवरील विकास व 2) समाजाची सद्यस्थिती समजणे.

गुरुकुलात विविध उपक्रमातून या दोन्ही गोष्टींवर भर दिला जातो.

  • व्यक्ती पातळीवरील विकासामध्ये ‘प्रत्येक व्यक्ती एक जबाबदार नागरिक’ हे सूत्र वापरले जाते. प्रामुख्याने नाते संबंद्ध, जबाबदार्‍या व कर्तव्यांचे भान यांच्यावर भर दिला जातो. गुरुकुलातील सामुहिक जीवन, विविध जबाबदार्या स्वीकारणे, सर्वांशी संवाद ठेवणे, स्वत:ची कामे स्वत: करणे (स्वावलंबन) यातून सामाजिक विकासास पूरक गुण विकसित होतात.

भविष्यात विद्यार्थी स्वावलंबी व्हावा व विद्यार्थांच्या मानसिक विकासासाठी उद्योगशील उपक्रम राबवले जातात. जसे खडू बनवणे, स्क्रीन प्रिंटिंग, वेल्डिंग, ग्रीटिंग कार्ड बनवणे. पण या उपक्रमांना बर्‍याचदा विविध शासकीय अभ्यासक्रमीय, भौगोलिक व आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागते. कारण याचा अंतर्भाव बोर्डाच्या अभ्यासक्रमात नाही, चांगल्या ट्रेनरचा अभाव, वेळेचा व प्राथमिकतेचा अभाव. तरीही हा उपक्रम विकसित करणे सुरु आहे. समाजाकडून यास दिवसेंदिवस प्रोत्साहन व सहकार्य मिळत आहे.

  • सामाजिक विकासात व्यक्ती संवेदनशील असणे सर्वात महत्वाचे आहे. संवेदना जागृत होण्यासाठी सद्य सामाजिक परिस्थिती समजून घेणे व अशा घटनांचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यावर गुरुकुलात भर दिला जातो.

विविध सामाजिक घटक समजून घेताना