‘स्वावलंबन’ गुरुकुलातल्या चतु:सूत्री मधील एक सूत्र आहे. येथील शेती व गोपालन गुरुकुलास संस्था म्हणून स्वावलंबी होण्यास हातभार लावत असतात. जवळपास 6 ते 7 एकरांवर शेती केली जाते. शेतीची खालील महत्वाचे वैशिष्ट्ये आहेत.
- शेती सेंद्रीय खत व कीटकनाशकांच्या मदतीने शेतीतून अधिकाधिक उत्पादन घेण्यावर भर असतो.
- गांडूळ खत प्रकल्पाच्या मदतीने 50 क्विंटल खत मिळते. गुरुकुलतील शेतीत खत वापरून बाहेर विक्री देखील केली जाते.
- 200 पेक्षा अधिक विविध फळझाडांची लागवड केलेली आहे व यांची फळे गुरुकुलातच वापरली जातात. चिकू, पेरू, आंबा, बोर केळी, पपई, नारळ, जांभूळ इ. झाड उपलब्ध आहेत.
- गुरुकुलात 200 जणांचा स्वयंपाक होत असतो. या साठी लागणर्याळ भाजी पाल्या मध्ये 90% स्वावलंबन आहे.
- शेतीचे संस्थेच्या आर्थिक स्वावलंबनात हातभार आहे.
- शेती मध्ये मुलांचा अंशत: सहभाग. यातून मुलांना खूप काही शिकायला मिळते.
- गुरुकुलातील जनावरांसाठी चारा उत्पादन याच शेतीतून केले जाते.
- स्वयंपाक व पाणी गरम करण्यासाठी लागणार्या् इंधनाचे (लाकडांचे) उत्पादन याच शेतीतून केले जाते.
गोशाळा
शेतीला पूरक जोडधंदा म्हणजे गो-पालन. डोंगराळ भाग असल्याने चारा मुबलक प्रमाणात उपलब्ध असतो. गुरुकुलातील गो-शाळेमुळे मुलांना घरचेच दुध व दुग्धजन्य पदार्थ (दही, ताक, तूप) भरपूर मिळतात.
गोशाळेविषयी काही ठळक मुद्दे:-
- 20-25 जनावरांची गोशाळा (गायी, म्हशी, बैल इ.)
- प्रतिदिन सरासरी 25-30 ली. दुध उत्पादन मिळते.
- शेणापासून सेंद्रीय खताचे व गांडूळ खताचे उत्पादन केले जाते.
- व्यवस्थापनात विद्यार्थ्यांचा सहभाग असतो.
- विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी चांगली प्रयोगशाळा आहे.
- शेतीसाठी बैलांचा वापर केला जातो. यातून इंधनाची बचत होते. तसेच प्रदुषन कमी होते.