गुरुकुलातील शिक्षणात विद्यार्थीशिक्षक (कार्यकर्ते) या दोहोंचाही विकास व्हावा असा प्रयत्न असतो. गुरुकुलाने शिक्षणाच्या माध्यमाने व्यक्ती (विद्यार्थी व कार्यकर्ते) विकासासाठी अवलंबलेली सूत्रे व उपक्रम पाहूयात.

गुरुकुलाचा विश्वास आहे की प्रत्येक व्यक्ती मूलत: परिपूर्ण असतो. गरज असते ती योग्य वातावरण व संधी देऊन सुप्त गुणांचा विकास करण्याची. व्यक्तिमधील सुप्त गुणांच्या विकासाचे प्रामुख्याने पाच भागांत वर्गीकरण केलेले आहे.

 1. शारीरिक विकास = उत्तम स्वास्थ्य
 2. मानसिक विकास = सुदृढ – संतुलीत मन
 3. बौद्धिक विकास = विवेकपूर्ण विचार व सृजनशीलता
 4. सामाजिक विकास = नातेसंबंध, जबाबदार्‍या व कर्तव्यांचे भान
 5. अध्यात्मिक विकास = संपूर्ण आनंदी जीवन

विद्यार्थी विकास

 • पारीवारिक वातावरणात अनौपचारिक संवाद, सहवास, निरीक्षण यातून विद्यार्थ्यांचा विकास सहज होत असतो.
 • विद्यार्थ्यांच्या विकासासंदर्भात वरील पाच भागांत सविस्तर माहिती दिली आहे.

कार्यकर्त्यांचा/ शिक्षकांचा विकास 

 • कार्यकर्त्यांमधील सद्गुणांचा व विविध कौशल्यांचा विकास करण्यासाठीचे विशेष प्रयोग केले जातात.
 • अभ्यास वर्ग: वर्षांतून दोन, (जवळपास 10 दिवस) विशेष अभ्यास वर्गाचे आयोजन केले जाते.
 • नियमित बैठका: दर आठवड्याला कार्यकर्त्यांची बैठक असते.
 • गुरुकुलाच्या बाहेर होणार्‍या विविध शसकीय व इतर कृती-सत्रांसाठी/ शिबिरांसाठी शिक्षक जात असतात.
 • माहाराष्ट्रातील प्रकल्पांना भेटी देणे हा द्विवार्षिक उपक्रम असतो.
 • वाचन, लिखाण, प्रकल्प पद्ध्तीने अभ्यास, विषयांचे सादरीकरण, चर्चा, स्मार्ट (SMART) या पद्धतीचा वापर केला जातो.