ग्लोबल वार्मिंग, प्रदुषन अस्या समास्यांचा विचार करता. गुरुकुलाने काही ठोस निर्णय घेतलेले आहेत.या समस्येला कृतीशील उत्तर शोधन्याचा प्रयत्न सुरु आहे.त्यासाठी विविध उपक्रम हाती घेतलेले आहेत. जसे की ऊर्जा संवर्धन, पर्यावरण संवर्धन.

अपारंपारिक ऊर्जा स्रोतांचा वापर करुन ऊर्जा संवर्धन करण्यावर भर असतो. हे अधिकाधिक व्हावे असा प्रयत्न केला जातो. या मध्ये प्रामुख्याने खालील गोष्टींचा अंतर्भाव केला जातो.

  • सौर उर्जेचा वापर: 

निवास व सार्वजनिक ठिकाणी सौर ऊर्जेचा वापर केला जातो. या मुळे वीज गेल्यामुळे होणर्‍या समस्या कमी झाल्या आहेत.

  • लाकडांचे स्थानिक उत्पादन व ऊर्जेसाठी वापर

गुरुकुलाच्या शेतीमध्येच उत्पादित होणारे लाकडांचा इंधन म्हणून वापर केला जातो.

जळलेल्या लाकडांचा – कोळश्यांचा पुनर्वापर केला जातो.