सध्या जागतिक पातळीवर वाढत असणार्‍या पर्यावरणाच्या समस्या व जीवनातील याचे महत्वाचे स्थान लक्षात घेता. ग़ुरुकुलात पर्यावरण हा विषय पुस्तकी न शिकवता प्रत्यक्ष कृतीतून शिकला व जगला जातो. ग्लोबल वार्मिंग सारख्या समस्येवर कृतीशील उत्तर शोधन्याचा प्रयत्न केला जातो. या साठी खालील विविध उपक्रम होत असतात. 

  • एक झाड दत्तक योजना

प्रत्येक विद्यार्थी व कार्यकर्ता एका(गरज असेल तर जास्त) वर्षासाठी स्वत: एक झाड लावतो व त्याचे संवर्धन वर्षभर करतो. याच्या लिखित नोंदी व मागोवा वेळोवेळी घेतला जाअतो. 

  • पावासाळ्याच्या सुरुवातीला बीजारोपण

उपक्रम पावसाची सुरुवात झाली की परिसरातील रानमाळामध्ये व डोंगरावर बीजारोपण केले जाते.

  • रोपवाटिका(नर्सरी)

वृक्ष लागवडीसाठी व बाहेर विक्रीसाठी शासनाच्या मदतीने रोपवाटिका बनवली जाते . यातून 2000 ते 3000 रोप दरवर्षी मिळतात.

  • डोंगरावरील झाडांचे वृक्षतोडी पासून संरक्षण

वेळोवेळी डोंगरावरील झाडांचे वृक्षतोडी पासून संरक्षण केले जाते. यात शासनाची मदत होत असते.

  • मोरांची देखभाल

गुरुकुलाभोवती मयूर अभयारण्य असल्याने या भागात खूप मोर आढाळतात. यांची विशेषत: उन्हाळ्यात काळजी घेण्याची गरज असते.

  • चर्चा सत्रे बौद्धिक स्पर्धा

वर्षभरामध्ये कार्यकर्ते, विद्यार्थी व विशेष तज्ञ यांच्या चर्चा सत्रांचे आयोजन केले जाते. या मध्ये पर्यावरणीय समस्यांची सद्य स्थिती व यावरतीच्या समाधानाविषयी चर्चा केले जाते.तसेच पर्यावरण विषयांवर निबंध, वक्तृत्व स्पर्धा आयोजित केल्या जातात.