गुरुकुल ही एक प्रयोग शाळा आहे. म्हणून गुरुकुलातील प्रत्येक उपक्रम हा एक प्रयोग असतो. या उपक्रमांमध्ये गरजांनुसार व नवीन ज्ञानानुसार सतत बदल केले जातात.
गुरुकुलाततील उपक्रम कल्पक, कृतीशील व सृजनात्मक असतात. या उपक्रमांमध्ये विद्यार्थी व कार्यकर्ते दोघेही ‘शिकत – शिकवत’ असतात. यातून सर्वांगीण (शारीरिक, मानसिक, बौद्धिक, सामाजिक व अध्यात्मिक) विकास व्हावा हाच प्रयत्न असतो.
उपक्रमातील विविधता लक्षात घेता ते वेगवेगळ्या वेळी होत असतात. इथे आपण दैनिक, साप्ताहिक, मासिक व वार्षिक उपक्रमांचे स्वरूप व त्यामागील भूमिका बघूयात.