गुरुकुलाची उपलब्धी विविध प्रकारे पाहता येऊ शकते.
- गेली 25 वर्षांपेक्षा अधिक काळ हा प्रकल्प शासन विनानुदानीत, समाजाच्या सहकार्यातून चालू आहे.
- मागील 25 वर्षांमध्ये गुरुकुलाबद्दल विश्वासार्हता निर्माण झाली आहे.
- विद्यार्थी विकासा बरोबरच विविध ग्राम-विकासाची कार्य केले गेले आहेत.
- गुरुकुलाची प्रेरणा घेऊन 7 सामाजिक संस्थांनी शैक्षणिक प्रकल्प सुरु केले आहेत.
- या शिवाय माजी विद्यार्थी व वेळोवेळी समाजाने विविध स्वरुपात दिलेले प्रोत्साहान म्हणजे पुरस्कार हे गुरुकुलाच्या उपलब्धीच्या मोजपट्ट्या ठरु शकतात.
माजी विद्यार्थी
गुरुकुलाच्या माजी विद्यार्थ्यांचा प्रभाव ते कार्यरत असलेल्या क्षेत्रात प्रकर्षाने जाणवतो.त्यांना लाभलेले नैतिक मूल्यांचे अधिष्ठान हेच त्यांचे वेगळेपण आहे.
- चार माजी विद्यार्थी गुरुकुलात पूर्ण वेळ कार्यरत आहेत.
- गुरुकुलाचे दोन माजी विद्यार्थी व तीन माजी कार्यकर्ते स्वतंत्रपणे सामाजिक संस्थांचे नेतृत्व करत आहेत.
- 10 विद्यार्थ्यांनी स्वत:चे स्वतंत्र व्यवसाय सुरु करुन उत्तम यश मिळवलेले आहे.
- भारतीय संरक्षण सेवेत 9 विद्यार्थी सेवारत आहेत.
- बहुतांशी माजी विद्यार्थी शेती व शेतीपूरक व्यावसाय प्रयोगशील वृत्तीने, उत्तमपणे करत आहेत.
- वैद्यकीय, अभियांत्रिकी क्षेत्रात शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढत आहे.
माजी विद्यार्थी मेळाव्यासाठी आलेले काही माजी विद्यार्थी
पुरस्कार
वेळोवेळी गुरुकुलाच्या कामाची पावती समाजाने विविध स्वरुपात दिलेली आहे. त्यातीलच एक मह्णजे पुरस्कार
· नातू फाउंडेशन , पुणे |
· 2000 |
· राष्ट्रीय विचार प्रबोधन परिषद, कोल्हापूर |
· 2000 |
· सामाजिक अध्ययन केंद्र,इन्दौर |
· 2001 |
· लायन्स क्लब, बीड |
· 2003 |
· चैत्र पल्लवी, लातूर |
· 2004 |
· ज्ञान प्रबोधिनी, पुणे |
· 2007 |
· स्नेहालय, अहमदनगर |
· 2008 |
· प्राज इंडस्ट्रीज, पुणे (सोशल अंत्राप्रेन्यूरशीप अवार्ड) |
· 2009 |
· शक्ती प्रतिष्ठान, बीड |
· 2010 |
· ज्ञान प्रबोधिनी, पुणे |
· 2012 |
Recent Comments