गुरुकुलात दरवर्षी नवीन विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. दरवर्षी 5 वीच्या वर्गात 35 ते 40 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. इतर 6 वी ते 9 वी च्या वर्गातील रिक्त जागा पाहून काही प्रवेश दिले जातात.
- दरवर्षी साठी 25 मे ही प्रवेशपूर्व चाचणीची नियोजित तारीख आहे.
सुचना: याची कुठल्याही प्रकारची जाहिरात केली जात नाही.
- प्रवेशेच्छुक विद्यार्थ्यांची गुरुकुलामध्ये लेखी व तोंडी परिक्षा घेतली जाते.
- विद्यार्थ्यांच्या पालकांशी चर्चा होते.
- विद्यार्थी निवडताना विद्यार्थ्यांच्या बौद्धिक गुणवत्तेपेक्षा विद्यार्थी व पालकांची इच्छा शक्ती व दृष्टिकोन लक्षात घेतला जातो.
- 6 वीच्या पुढे रिक्त जागा असल्यासच प्रवेश दिला जातो.
- 10% गरीब विद्यार्थ्यांना शुल्कात सवलत दिली जाते.
- प्रवेश चाचणी नंतर प्रवेशाचा निकाल लेखी पत्र किंवा फोन ने कळवला जातो.
जर आपण पुढच्या वर्षीच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ इच्छीत असाल तर इथे दिलेला फॉर्म भरून त्वरित गुरुकुलाच्या पत्त्यावर पाठवावा. 25 मे रोजी पाल्य व पालक येणे अपेक्षित आहे. त्या नंतरच प्रवेश पक्का केला जाईल.
फॉर्म डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.