सोनदरा गुरुकुलम् हा दीनदयाळ नवरचना प्रतिष्ठान संचलित निवासी शैक्षणिक प्रकल्प आहे. दीनदयाळ नवरचना प्रतिष्ठान ही स्वयंसेवी संस्था (NGO) आहे. संस्थेचा नोंदणी क्र: महा. एफ.1365 आहे.

ऊसतोडीसाठी जवळपास 6 महिन्यांसाठी होणारे स्थलांतर शिक्षणाचा अडथळा आहे. अनेक सामाजिक समस्यांचे मुळ देखील शिक्षण आहे. हे ओळखून श्रद्धेय नानाजी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली 1986 साली सोनदरा गुरुकुल प्रकल्पाची सुरुवात झाली.

  • शिक्षणग्रामविकास ही या प्रकल्पाच्या कार्याची मूलभूत भाग आहेत.
  • गुरुकुल महाराष्ट्रातील एक अभिनव शैक्षणिक प्रकल्प म्हणून उदयास येत आहे.
  • गुरुकुलाचे लाभार्थी पूर्ण मराठवाडा व प. महाराष्ट्र, विदर्भातील काही जिल्ह्यातून आहेत. 
  • आज पर्यंत 1500 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी गुरुकुलातून शिक्षण घेतलेले आहे.
  • सध्या 180 पेक्षा जास्त निवासी विद्यार्थी इथे शिक्षण घेत आहेत.

सोनदरा गुरुकुलाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी माहितीपट: