शिक्षणाचे मूलभूत दोन अंगे आहेत. पहिले अंग म्हणजे कौशल्यांचे शिक्षण व प्रशिक्षण. जगभरात विविध शैक्षणिक पद्धतीने कौशल्य शिकले व शिकवले जातात. कौशल्य शिकण्यासाठी बहुतेक वेळा शरीर व बुद्धीचा विकास व्हावा लागतो. अशी कौशल्य शिक्षक/ प्रशिक्षक यांचे मार्गदर्शन व स्वयंअध्ययन यातून आत्मसात करता येतात. कौशल्यांच्या विकासातून मानवाची भौतिक गरजांची पूर्ती होते. याच बरोबर सामाजिक रचनेमध्ये सेवा व सुविधांचे योगदान याच कौशल्यातून मानव देत असतो.म्हणून शिक्षणामध्ये याचा अंतर्भाव होणे महत्वाचे आहे. विशेषत: भारता गावां-गावांत वसलेला असल्याने ग्रामीण शिक्षणामध्ये याची व्यवस्था करणे खूप गरजेचे आहे.
शिक्षणाचे दुसरे अंग म्हणजे मानवाला पूर्ण सुख, आनंद मिळणे. या साठी मानवात असलेल्या सुप्त गुणांचा, मूल्यांचा विकास होणे. याचा संबंध मानवाच्या मनाशी व आत्म्याशी असतो. योग्य मार्गदर्शन, व्यक्तिगत इच्छाशक्ती व स्वयंप्रयत्न यांतून या सद्गुणांचा विकास होतो. या दोन्ही शिक्षणाच्या समन्वायातून मानवाला पूर्ण शिक्षण मिळू शकते. अशा शिक्षणाची व्यवस्था निर्माण करण्याची आवश्यक्ता आहे. यातून वर्तमानातील समस्या सुटतीलच पण याबरोबरच उच्चतम विकसित समाजाची निर्मिती होण्याची पूर्ण संभावना आहे.आशा आहे गुरुकुल संशोधनाच्या माध्यमाने या दोन्ही क्षेत्रात सेवा देत राहील.