सोनदरा गुरुकुलास सुरु होऊन पाव शतक (25 वर्षे) झालेले आहेत (स्थापना: जुलै 1986) . या कालावधीतील खडतर प्रवासात गुरुकुल माळरानातील खडकात एखाद्या रोपट्याने बाळसे धरावे असे वाढले आहे. असंख्य हातांचे ओंजळभर पाणी व मूठभर खत याने हे रोपटे वाढत आहे. या काळात प्राथमिक गरजा व अस्तित्वासाठी अधिक ऊर्जा खर्च झाली आहे. याच काळात गुरुकुल विविध प्रयोग व सेवेच्या माध्यमाने कार्यरत राहिले आहे. पण शिक्षणाशी संबंधित हवे तसे अद्याप कार्य झालेले नाही. त्या कामाला आता खर्‍या अर्थाने सुरुवात झालेली आहे. आता हे रोपटे कल्पवृक्षात रुपांतरित व्हावे. आपल्या फळा-फुलांनी सर्वांना तृप्त करावे. यातून गुरुकुलाचे लक्ष्य “युगानुकूल उच्चतम सामाजिक नवरचना करणे” साकार होईल.

या दृष्टीने गुरुकुलाची भविष्यातील कार्य पुढील प्रमाणे राहतील :

  1. संशोधन
  2. मुलींसाठी शिक्षण
  3. पंचक्रोशीतील शाळांचा विकास
  4. उद्यमिता विद्यापीठ
  5. ग्राम-विकास
  6. व्यवस्थापन