स्त्री व पुरुष ही समाजाच्या रथाची दोन चाकं आहेत. दोन्ही चाकांशिवाय रथ अधुराच आहे. स्त्रीयांचा विकास व्हायालाच हवा अशी सर्वांचीच ईच्छा आहे. गुरुकुलाच्या सुरुवातीपासून गुरुकुलास या बाबीचे दु:ख वाटत राहिले की आपण मुलींच्या शिक्षणाची व्यवस्था गुरुकुलात करू शकलो नाही. म्हणून सर्वात जास्त प्राधान्य गुरुकुलात मुलींच्या शिक्षणाची सुरुवात करणे याला देण्यात आलेले आहे.