गावाचा विकास, शाळेचा विकास व विद्यार्थ्यांचा विकास ही सर्व हातात हात घेऊन चालणारे घटक आहेत. म्हणून शिक्षणग्रामविकास ही गुरुकुलाची महत्वाची एकमेकांस पूरक अशी कार्यक्षेत्रे आहेत.

शिक्षण

गुरुकुलातील शिक्षणात विद्यार्थी व शिक्षक (कार्यकर्ते) दोघांचाही विकास व्हावा असा प्रयत्न असतो. गुरुकुलाने शिक्षणाच्या माध्यमाने व्यक्ती (विद्यार्थी व कार्यकर्ते) विकासासाठी अवलंबलेली सूत्रे व उपक्रम पाहूयात. गुरुकुलाचा विश्वास आहे की प्रत्येक व्यक्ती मूलत: परिपूर्ण असतो. गरज असते ती योग्य वातावरण व संधी देऊन सुप्त गुणांचा विकासास वाव देण्याची. हे गुरुकुलात कसे अवतरते? तसेच गुरुकुलाची शिक्षणामागची भूमिकेची सविस्तर माहिती इथे  पाहू या.

ग्राम विकास

व्यक्ती-विकासासाठी सामाजिक व नैसर्गिक घटक सहाय्य करत असतात. या अधारावर गुरुकुलाने ग्राम-विकास आपले कर्तव्य व जाबाबदारी मानलेली आहे. या साठी गुरुकुलाभोवती असलेल्या पंचक्रोशीत विविध उपक्रम होत असतात. उदा. सातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, गणेशोत्सव, पालक मेळावा अशा निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमाने प्रबोधन केले जाते.