सध्याच्या शिक्षण प्रकियेमध्ये पैसा व मनुष्यबळ यांची फार मोठी गुंतवणूक आहे. कमीत कमी गुंतवणूकीमध्ये सर्वांसाठी दर्जेदार शिक्षण उपलब्ध व्हावे. या साठी विशेष संशोधन व अभ्यास पुढील काळात गुरुकुलात व्हावा असा गुरुकुलाचा मानस आहे.

या साठी एक अभ्यासपूर्ण सिस्टीम बसवणे गरजे आहे. ही सिस्टीम व्यक्ती आधारित न ठेवता उत्तमतेकडे कशी नेता येईल असा प्रयत्न व अभ्यास केला जाणार आहे.