समाजाच्या सहकार्याने, प्रेमाने सोनदर्‍याच्या खडकाळ माळरानात स्वत:ची मूळे घट्ट रोऊन हा वटवृक्ष वाढत आहे. या प्रवासात विविध घटना मैलाचे दगड बनलेल्या आहेत . यांचा हा थोडक्यात आढावा.

 • 21 जुलै 1986 ला बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगाराच्या मुलांसाठी प्रकल्पाची सुरुवात झाली.
 • संकल्पना व सुरुवात श्री. कृ. दा. जोशी (दादा) पुणे.
 • डोमरी येथील श्री. शंकर गेणू भोंडवे यांनी सात एकर जमीन दान दिली.
 • डोमरी गावातील दाम्पत्य श्री. सुदाम भोंडवे(काका) व सौ. सिंधू भोंडवे(मामी) यांनी प्रकल्पासाठी पूर्णवेळ वाहून घेतले.
 • श्री. नानाजी देशमुख यांचे दिशादर्शन व दीनदयाळ शोध संस्थान अंतर्गत प्रकल्प संचलनास सुरुवात.
 • बीड जिल्ह्यातील स्थनिक कार्यकर्त्यांच्या समितीद्वारा व्यवस्थापन.
 • प्रकल्पाच्या शेतीवर 1000 फळझाडांची लागवड, भाजीपाला व जनावारांसाठी चारा उत्पादन.
 • सुरुवातीच्या काळात विंचु, साप, कोल्हे, अपघात यासारख्या समस्या.
 • मे 1987 मध्ये  नानाजींच्या मार्गदर्शनाखाली 30 दिवसांचे धन्यता अभियान शिबीराद्वारे तलावातील गाळ काढला.
 • पहिली 12 वर्षे झोपड्यांतून निवास.
 • 2004 -05 साली आवश्यक मूलभूत सुविधाची दीनदयाळ शोध संस्थानकडून उपलब्धता.
 • 2004 साली शाळा म्हणून महाराष्ट्र शासनाची मान्यता.
 • श्री. माधवराव दांडेकर यांच्या नेतृत्वाखाली बांधकामासाठी मुंबई समितीद्वारा आर्थिक योगदान.
 • पुणे येथून सौ. प्रतिक्षा रानडे व सहकार्यांद्वारा आर्थिक मदत व मार्गदर्शन.
 • पुणे येथील प्रसिध्द आयुर्वेद वैद्य खडीवाले यांचा औषधनिर्मिती प्रकल्प गुरुकुलात सुरु झाला. मा. वैद्यांद्वारा आर्थिक व आरोग्य उपचाराच्या दृष्टीने सातत्यपूर्ण योगदान.
 • 2007 पासुन व्यवस्थापनाच्या सुविधेसाठी ‘दीनदयाळ शोध संस्थान’ यांच्याकडून ‘दीनदयाळ नवरचना प्रतिष्ठान’ कडे हस्तांतरण.

Beginning of Gurukulam

प्रारंभीचा निवास                                        धन्यता अभियान शिबीर                                झोपडी समवेत कृ.दा. जोशी(दादा)