रोज संध्याकाळी 7 ते 8 हा एक तास व्यक्तिमत्व विकासाचे अनेक उपक्रम घेतले जातात. या उपक्रमांची पाक्षिक व मासिक रचना केलेली असते.

यातील काही उपक्रम:

  • प्रश्न मंजुषा:

उद्देश : सामान्य ज्ञान वाढावे. विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी.

या उपक्रमात अद्ययावत सामान्य ज्ञानावर आधारित विविध प्रश्न विचारले जातात. 4-5 गटांमध्ये हा उपक्रम घेतला जातो.

  • विविध गुणदर्शन

उद्देश : सुप्त कलागुणांना वाव देणे.

या मध्ये स्वेच्छेने मुलं/ कार्यकर्ते विविध कला सादर करतात जसे गाणे, गोष्ट, विनोद, एकांकिका, एकपात्री नाटुकले, प्रश्नोत्तरे इत्यादी.

  • कथाकथन

उद्देश : मनोरंजन व्हावे, वक्तृत्व गुण विकसित व्हावा व कथेच्या माध्यमाने विद्यार्थी संवेदनशील व्हावेत.

एक विद्यार्थी किंवा कार्यकर्ता कथाकथनाची तयारी करुन सादर करतात. शेवटी काय आवडले व सुधारण्यास कुठे वाव आहे यावर चर्चा होते. 

  • सी.डी. दर्शन

उद्देश : मनोरंजन व्हावे, विविध विषयांचे ज्ञान वाढावे.

विविध विषयांवर सी. डी. बघून त्यावरती चर्चा किंवा कृती असते. 

  • वक्तृत्व

उद्देश :वक्तृत्व कला विकसित होणे.

विद्यार्थ्यांना विविध विषय दिले जातात. पंधरा दिवसांमध्ये त्या विषयाशी संबंधित वाचन करून तयारी केली जाते. हवी तेंव्हा कार्यकर्त्यांची मदत घेतली जाते. सर्वां समोर विद्यार्थी भाषन देतात. हा उपक्रम स्पर्धात्मक स्वरुपाचा असतो. योग्यता असणार्‍या विद्यार्थ्यांना जिल्हा व राज्य स्थारांवर पाठविले जाते.

  • शालाबाह्य वैज्ञानिक उपक्रम

उद्देश : वैज्ञानिक व चिकित्सक दृष्टीकोन तयार व्हावा.

वर्गश: विद्यार्थी व कार्यकर्ते मिळून अभ्यासक्रमाबाहेरील विविध प्रयोग करतात. त्या प्रयोगामागील विज्ञान चर्चेतून समजून घेतले जाते. बर्‍यारचदा विज्ञानाचे शिक्षक संकल्पना समजावतात.

  • चर्चा/ वाद-विवाद

उद्देश : विवेकपूर्ण (Rational) विचार करण्याची कला विकसित व्हावी. विविध विषयांवर गटश: चर्चा/ वाद-विवाद होते. \

  • विचारा प्रश्न

उद्देश : विद्यर्थ्यांत उत्सुकता निर्माण व्हावी व कार्यकर्त्यांना विचार करण्याची/ वाचनाची आवड लागावी. विद्यार्थी त्यांना आजुबाजूचे जग पाहून पडलेले मुक्त प्रश्न विचारतात. सर्व कार्यकर्ते मिळून या प्रश्नांची उत्तरे देतात.

  • नाट्यतरंग व प्रसंग नाट्य

उद्देश : अभिनय कला विकसित व्हावी.

विद्यार्थी गटश: विविध विषयांवर किंवा भाषा विषयांतील धड्यांवर अधारीत 20-25 मिनीटांचे नाटुकले बसवून सर्वांसमोर सादर करतात.

  • गीत-गंगा

उद्देश : गायन (गाणे व ऐकणे) कला विकसित व्हावी.

गीतांवर अधारीत मुक्त गायनाचा व अंताक्षरीचा कार्यक्रम होतो.

  • पाठांतर

उद्देश : जीवनोपयोगी विचारांचा साठा बुद्धीमध्ये रहावा.

संस्कारक्षम गीत, उतारे, सुविचार, स्तोत्र प्रार्थना यांचा अंतर्भाव या उपक्रमात होतो. वैयक्तिक व गटश: हे पाठांतर होत असते.

  • बैठक

उद्देश : दैनिक व्यवस्थापन व वैयक्तिक समस्यांचे निराकरण वेळीच्या वेळी व्हावे.

एक कार्यकर्ता व 20 मुलांचा एक गट प्रमाणे बैठका होत असतात.

  • चित्रपट पहाणे

उद्देश : मनोरंजन करणे व नवीन माहिती मिळवणे.

मराठी, हिंदी व इंग्लिश विविध चित्रपट दाखवले जातात. बर्याचचदा या मध्ये विविध विषयांवरचे माहितीपट देखील असतात.

  • अवांतर वाचन

उद्देश : वाचनाची गोडी लागावी व विविध क्षेत्रांची व्यापक माहिती मिळावी.

गुरुकुलातील वाचनालयामध्ये विविध विषयंवार विविध प्रकारचे पुस्तकं आहेत. याचे वाचन करण्यासाठी विशेष प्रोत्साहन व वेळ दिला जातो.

  • हस्त-लिखित

उद्देश : लिखाणाची व विचारांची कला विकसित व्हावी.

विद्यार्थी व कार्यकर्ते मिळून याची नवनिर्मिती नियमित करतात. या मध्ये नवनिर्मित लेख, कविता, चित्र, विनोद यांचा सामावेश असतो.

  • मुक्त-विहार

उद्देश : निसर्गाशी एकरुप होणे व निसर्गात बागडण्याचा सात्विक आनंद घेणे.

अधून मधून परिसरातील डोंगरावर फिरण्यास गटश: मुलं आणि कार्यकर्ते जात असतात.

  • बोलका फळा (फलक लेखन)

उद्देश : लिखाणाची व विचारांची कला विकसित व्हावी.

मोकळ्या जागेत खूले फलक लावलेले असतात. या फलकांना बोलका फळा म्हटले जाते. विद्यार्थी व कार्यकर्ते या फलकावर विविध कात्रणं, लेख, कविता, चित्र, विनोद हे लावतात आणि या फळ्याला बोलकं करतात.

  • तज्ञांचे मार्गदर्शन:

उद्देश : विविध क्षेत्रांची ओळख व्हावी व अधिक जाणून घेण्याची उत्सुक्ता निर्माण व्हावी.

विविध क्षेत्रात कार्य करणार्याक सामान्य व विशेष प्रावीण्य मिळवणार्‍या तज्ञांना आमंत्रीत केले जाते. त्यांचे विद्यार्थी व कार्यकर्ते यांच्या बरोबर मुक्त गप्पांचे सत्र असते. शेवटी मनातील शंकाचे निरसन केले जाते.