- उपासना — 30 मिनीटे
मन:शांतीसाठी उपासना, ध्यान, मनन.
- मौन — 30 मिनीटे
- शारीरिक स्वास्थ्यासाठी — 45 मिनीटे
व्यायाम, प्राणायाम, योगा, ट्रेकिंग, शारीरिक स्वच्छता, पोहणे.
- स्वच्छता व श्रमयोग — 45 मिनीटे
निवास – परिसर स्वच्छता, बागकाम, साप्ताहिक सामुहिक श्रमानंद.
- अध्यापन- अध्ययन — 7 तास
आनंददायी प्रयोगशील गटश: व वर्गश: अध्यापन आणि अध्ययन
- वाचन — 30 मिनीटे
ग्रंथालयातील ग्रंथ, नियतकालिके –मुक्त वाचन
- आनंददायी खेळ — 90 मिनीटे
देशी-विदेशी, मैदानी-बैठे वर्गश: खेळ
- फुलण्या उमलण्यासाठी विविध पाक्षिक व मासिक उपक्रम साखळी — 60 मिनीटे
कथाकथन, प्रश्न मंजुषा, शाळाबाह्य विज्ञान प्रयोग, गायन, वक्तृत्व, इ.
- ताजं ज्ञान — 30 मिनीटे
दूरदर्शन वरील नियमित बातम्या
- पौष्टिक आहार
सकाळी दूध, सकाळी व संध्याकाळी नाश्ता, दोन जेवन(दुपारचे व रात्रीच्या जेवणात दूध, ताक, फळ, भाज्या गुरुकुलातील उत्पादनाचा सामावेश)
- विश्रांती — 7 तास
दैनिक विशेष उपक्रम
- दैनंदिनी (डायरी)
आज दिवसभराचा माझा आरसा म्हणजे दैनंदिनी – असे गुरुकुलतील सर्वजन समजतात. दररोज रात्री झोपण्या आधी दैनंदिनी लिहीली जाते.
- अभ्यास दैनंदिनी
अभ्यास दैनंदिनी या उपक्रमामध्ये शालेय विषयांत मी काय शिकलो. याचा आढावा मुलं थोडक्यात घेतात. याने अभ्यास दृढीकरणास खूप फायदा होतो.
- आजचा मनन प्रश्न
मनन म्हणजे सखोल व संपूर्ण विचार. प्रत्येक दिवशी व कधी कधी एका पेक्षा जास्त दिवसांसाठी जीवनाशी संबंधीत प्रश्न घेतला जातो. सर्वजन सर्वजन त्यावरती लिखित मनन करुन मला काय उमगले, इंटर्नलाइज (Internalize) झाले हे बघतात.