सोनदरा गुरुकुलम् बालाघाटाच्या डोंगररांगांमध्ये निसर्गाच्या कुशीत वसलेले आहे. चारीही बाजूंनी उंच डोंगर, त्याच्या मध्ये डोंगराच्या पायथ्याशी 10 एकर परिसरात गुरुकुल आहे. ‘सोनदरा’ या दरी मध्ये गुरुकुल असल्याने ‘सोनदरा गुरुकुलम्’ असे म्हटले जाते. गुरुकुलाला लागूनच असलेले तीन तलाव सौंदर्यात भर टाकतात. हा सर्व परिसर विविध झाडं, पक्षी व प्राण्यांनी भरलेला आहे. मोर या भागात सर्वाधिक अढळणार्‍या पक्ष्यांपैकी एक पक्षी आहे.

महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात गुरुकुल आहे. बीड शहरापासून 36 कि.मी. अंतरावर डोमरी गावानजीक 10 एकरांच्या परिसरात हा शैक्षणिक प्रकल्प आहे.

इथे कसे पोहचायचे?

टपाल पत्ता:

दीनदयाळ नवरचना प्रतिष्ठान,
सोनदरा गुरुकुलम् डोमरी,
ता. पाटोदा, जि. बीड. – 414 204