शाळा व गाव हे एकमेकांचे आरसे आहेत असे म्हटले जाते. शाळा एक उत्तम नागरीक घडावणारा सद्य समाजा पासून वेगळा असा जादूचा डब्बा असू शकत नाही. गावाचा विकास, शाळेचा विकास, विद्यार्थ्यांचा विकास व समाजाचा विकास ही सर्व हातात हात घेऊन चालणारी घटक आहेत. म्हणून गावाच्या विकासाला प्राधान्य दिलेले आहे. आतापर्यंत गुरुकुलाच्या माध्यमातून ग्राम-विकासाची विविध कार्य झालेले आहेत. पण ते निरंतरतेने चालू शकलेले नाहीत. म्हणून पुढील काळात ग्राम विकासाची उपक्रम स्थिर करणे. हे एक गुरुकुलाचे ध्येय राहिल.