शिक्षाणाचे एक प्रमुख उद्दीष्ट हे आहे की शिक्षणातून विद्यार्थ्याला असे प्रशिक्षण मिळावे की तो समाजाच्या कार्यभागात एक उत्तम नागरीक बनून सहयोग करू शकायला हवा. बर्‍याचदा सद्य शिक्षण पद्धतीमध्ये ही बाब कमी दिसते. तसेच सद्य समाजात बेरोजगारी ही एक खूप भेडसवणारी समस्या आहे. या समस्येला यातून उत्तर मिळावे अशी आशा आहे. म्हणून विविध व्यावसायिक कौशल्यांचा शिक्षणात अंतर्भाव कराण्याचा गुरुकुलाचा प्रयत्न राहिल. त्याचे प्रशिक्षण व त्यातून उत्पादनाचे व्यवस्थापन हे दोन घटक आहेत.

संशोधनाअंती असे लक्षात आले आहे की- विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड ऊर्जा असते. नैसर्गिकत: त्यांना या ऊर्जेचा पुरेपुर वापर करण्याची ईच्छा असते. या ऊर्जेचा विधायक विकासाच्या कार्यात उपयुक्तता वाढावी हा या उद्यमिता विद्यापीठाचा प्रयत्न राहील.

याच बरोबर संशोधनाअंती असेही लक्षात आले आहे की – विद्यार्थ्यांच्या मानसिक व बौद्धिक विकासासाठी त्यांच्या पंचेंद्रीयांना वाव मिळेल अशा शिक्षण पद्धतीची गरज आहे. हे उद्दीष्ट्य उद्यमिता विद्यापीठाच्या माध्यमाने पूर्ण व्हावे असा प्रयत्न करणार आहोत.