- गुरुकुलात पाहुण्यांचे नेहमीच स्वागत असते. शक्यतो उत्तम व्यवस्थेसाठी पूर्व कल्पना देऊन येणे अपेक्षित असते.
- गुरुकुल मर्यादित व्यक्तींसाठी निवासाची व भोजनाची व्यवस्था करू शकते. इथे शाकाहारी भोजन व साधी – नीटनेटकी राहण्याची व्यवस्था केली जाते. जर आरोग्याची काही विशेष अडचण असेल तर गुरुकुल भोजनाची योग्य व्यवस्था करण्याचा प्रयत्न करेल अथवा इतरांसारखेच सर्वांना अन्न राहील.
- स्वावलंबन हे गुरुकुलाचे सूत्र आहे, तरी पाहुण्यांनी सहयोग द्यावा ही विनंती.
- पाहुण्यांनी स्वत:ला व बरोबरच्या साथीदारांना दारु, तंबाखू व सिगारेट सारख्या विषारी व्यसनांपासून दूर ठेवावे ही विनंती.
- पाहुण्यांना विनंती आहे की गुरुकुलाला भेट देण्याआधी भेटीचा उद्देश, व्यक्तींची संख्या, अभ्यासाचा एखादा नेमका विषय आणि किती दिवसांची भेट आहे हे आधीच कळावावे. यामुळे गुरुकुल पाहुण्यांच्या भेटीच्या उत्तमोत्तम फायद्यासाठी विशेष नियोजन करु शकेल. याच बरोबर गुरुकुलाचे वेळापत्रक देखील बिघडणार नाही.
गुरुकुलात कसे पोहचायचे?
Recent Comments